प्राध्यापिकेला फसविण्याचा प्रयत्न

0

पनवेल : तुम्हाला आमच्या कंपनीमार्फत लॉटरी लागली आहे. याकरिता तुम्ही काही रक्कम आम्ही दिलेल्या खात्यात जमा केल्यास तुम्हाला लाखोंची रक्कम लगेच मिळू शकेल, असे सांगून खारघर मधील एका प्राध्यापिकेला त्रास देना-या अनोळखी इसमांविरोधात या महिलेने खारघर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. विशेष म्हणजे वारंवार नकार देऊन देखील अनोळखी इसम वारंवार या प्राध्यापिकेला दूरध्वनी करून हैराण करीत असल्याचा प्रकार खारघर मध्ये घडला आहे.
या प्रकाराने हैराण झालेलया प्राध्यापिकेने पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांना अशा प्रकारावर आळा घालण्याची विनंती केली आहे. पोलीस देखील अशाप्रकाराबाबत गंभीर नसल्याचे या प्राध्यापिकेने सांगितले . सुरुवातील पोलिसांनी यासंदर्भात तक्रार नोंदविण्यास देखील चालढकल केली असल्याचे त्यांनी सांगितले .नजीकच्या काळात अशाप्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे . विविध आमिषे दाखवून अनेकांना फसविण्याचा प्रकार घडत आहे . या अशा खोट्या फसव्या प्रकाराच्या आहारी जाऊन काही नागरिक या अशा फसवणुकीच्या आहारी जात आहे . त्यामुळे पोलिसांनी आशा टोळीचा शोध घेऊन त्यांच्यावर आळा घालणे गरजेचे आहे . यासंदर्भात तपास अधिकारी अरविंद वळवी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही .