प्रामाणिक चालकांच्या रिक्षांना ‘स्टिकर’

0

जळगाव । नियमित लायसन्स, परमिट, इशोरन्स तसेच नियमांचे पालक करून परिपूर्ण कागपत्र असणार्‍या अशा प्रामाणिक चालकांच्या रिक्षांवर सोमवार पासून ‘स्टिकर’ लावण्यात येणार असून त्यांना यापूढे कोणत्याही कारवाईचा त्रास होणार नाही. मात्र, बेशिस्त व नियमांचे पालन न करणार्‍या रिक्षा चालकांवर कारवाईचा बडगा आता उगारण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी दिली.

पोलिस मुख्यालय परिसरातील मंगलम हॉल येथे शहर वाहतुक नियत्रंण शाखा यांच्यातर्फे शनिवारी सकाळी 11 वाजता रिक्षा चालकांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी रिक्षाचालकांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. याप्रसंगी आयोजित मेळाव्याच्या व्यासपिठावर पोलिस उपअधीक्षक महारू पाटील, डिवायएसपी सचिन सांगळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, शहर वाहतुक शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदिप देशमुख, जिल्हा वाहतुक शाखेचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर गाढे पाटील, दिलीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल देशमुख यांनी केले.

सोमवारपासून फ्रंट व स्क्रॅप रिक्षांवर कारवाई
फ्रंट सिट बसवून रिक्षाचालक नेहमी स्वत:चा व इतरांचा जीव धोक्यात टाकून रिक्षा चालवित असता. तर शहरासह, महामार्गवर स्क्रॅप रिक्षा चालतात यातही चालक धोका पतकारतो. त्यामुळे सोमवार पासून फ्रंट सीट बसविणार्‍या तसेच स्क्रॅप रिक्षा चालविणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येईल अशी सुचना डॉ. सुपेकर यांनी रिक्षाचालकांना दिली. तसेच काही चालका रिक्षात टेप लावण्याची बंदी असतांनाही लावतात. तर आतल्या भागात आरसा लावतात. याबाबत प्रवाश्यांच्या तक्रारी आल्याअसून टेप व आरसा काढून टाका. प्रवाश्यांनी उध्धट बालणे टाळा असेही त्यांनी सांगितले.

स्मार्ट सिटीसाठी रिक्षाचालकांचा महत्वाचा ‘रोल’
शहरात जिल्ह्यातील तसेच राज्यातील इतर राज्यातून लोक येतात रिक्षा चालकांकडून निट वागणूक मिळत नसल्याने ते तक्रारी करतात. त्यातच रिक्षाचालकाचा स्मार्टसिटीसाठी महत्वाचा रोल असतो त्यामुळे प्रवाश्यांना जी माहिती हवी असेल ती सांगा, त्यांच्याशी नीट वागा, तुम्ही निट वागलात तर तो प्रवासी तुमचंच नाम काढेल असे डॉ. सुपेकर यांनी रिक्षाचालकांना उद्देशून सागितले. यानंतर त्यांनी नियमांचे पालन न करणार्‍या तसेच परमिट असलेल्या रिक्षाचालकांना त्रास देणार्‍या अशा रिक्षाचालकांचे नाव व त्यांच्या रिक्षांचे नंबर देण्याचे सुचना केल्या. रिक्षा चालक हा पोलिसांचा मित्र झाला पाहिजे असे देखील त्यांनी सांगितले.

मिटर लावा, उत्पन्न वाढेल!
शहरातील 99 टक्के रिक्षा चालकांनी मिटर लावले आहेत, त्यामुळे त्यांनी इलेक्टॉनिक मिटरचा वापर करावा, उत्पन्न वाढण्यास सुरूवात होईल. मिटरप्रमाणे भाडे घ्या तुम्हाला जास्त व्यावसाय मिळले, अशी सुचना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी रिक्षाचालकांना केली. यानंतर त्यांनी 4 हजार 50 रिक्षा आहेत. यातील 40 टक्के सुस्थितीत आहेत तर 60 टक्के सुस्थितीत नसल्याची त्यांनी खंत व्यक्त केली. यातच रिक्षाचालकांनी आठ दिवसांच्या आत परवाना नुतनीकरणासाठी अर्ज कराव असे त्यांनी सांगितले. शासनाने 16 वर्षानंतर विविध शुल्कांमध्ये वाढ केली आहे. या आधी कधीही वाढ केली नाही, अशी माहिततीत्यांनी यावेळी केली.

बेशिस्त चालक दमदाटी करतात
मेळाव्यात रिक्षाचालकांनी आपल्या तक्रारी मांडल्या. यात एका चालकांने टॉवर चौकात परमिट असलेले रिक्षाचालक तासंन-तास प्रवाश्याची वाट पाहत उभे असतात. परंतू प्रवासी आल्यावर मागून आलेला बेशिस्त रिक्षाधारक प्रवासी घेवून निघून जातो. त्यांना जाब विचारले असता ते दमदाटी करतात. यातच पोलिस आमच्याशी उध्ध्टपणे वागतात, त्यांनाही सुचना करावा कराव्या, अशी तक्रार चालकाने केली.

नियमांनुसार चालकांनी वागण्याचा सल्ला
डॉ. सुपेकर मेळाव्यात पुढे बोलतांना म्हणाले की, रिक्षांवर स्टिकर लावले गेल्यानंतर नेहमी नियमांनुसार चालकांनी वागावे, तर नेहमी रिक्षा चालक-मालकांचे मेळावे घेण्यात येतात परंतू मेळाव्यात ठरवलेल्या गोष्टींवर कोणीही अंमलबजावणी करत नाही. येत्या 20 तारखेपासून प्रत्येकाने त्यांना असलेला गणवेश परिधान करावा असे त्यांनी सांगितले.

भूर्दंड कमी करावा
रिक्षा चालकांना शहरात थांबे नव्हते परंतू पोलिस प्रशासनामुळे त्यांना शहरात 95 थांबे मिळाले परंतू 305 थांबे शहरात आणखी असून ते देखील मिळावे. यातच 1 जानेवारी पासून क्रेंद शासनातर्फे लायसन्स व परवाना नुतनीकरणासाठीचा भुर्दंड वाढविण्यात आला असून तो प्रशासनाने कमी करवा अशी मागणी रिक्षा युनियनचे अध्यक्ष दिलीप सपकाळे यांनी मेळाव्यात मनोगत व्यक्त करतांना पोलिस अधीक्षकांकडे केली. भुर्दंड कमी करावा यासाठी 1 मे रोजी संप पुकारण्यात येणार असून त्यात आम्ही सहभागी होवून आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिला.