जळगाव । प्रारूप प्रभाग रचनेनुसार केलेल्या तीन प्रभागांबाबत आज चार हरकती मनपास प्राप्त झाल्या. यात प्रभाग क्रमांक 8 बाबत दोन, प्रभाग 2 व 16 यावर एक-एक अशा एकूण चार हरकतीचे अर्ज आलेय नवीन प्रभाग रचनेनुसार झालेल्या प्रभाग 2 वर नगरसेविका गायत्री शिंदे यांनीघे हरकत घेतली आहे. या हरकतीत त्यांनी म्हटले आहे की, निवडणुक कार्यक्रमाचे आखणी कायदेशीर करण्यात आलेली नाही. आधी प्रभाग रचना केल्यानंतर हरकती मागवून नंतर आरक्षण सोडत काढली जाते. तसेच प्रभाग रचना ही प्रभागाची भौगोलिक रचना विचारात घेवून काढली जाते तसे झालेले दिसत नाही.
कांचननगरचा भाग प्रभाग 2 मध्ये चुकीच्या पद्धतीने जोडला आहे. तो काढावा अशी हरकतीमध्ये नमूद केले आहे. प्रभाग क्रमांक 8 बाबत नंदकिशोर मराठे, संतोष मराठे यांनी दाखल केलेल्या हरकतीमध्ये द्रोपदीनगर, निवृत्तीनगर लागून असून तो प्रभाग आठमध्ये समावेश करावा अशी मागणी केली आहे. तर प्रभाग 16 बाबत प्रदीप श्रीश्रीमाळ यांनी घेतलेल्या हरकतीत प्रभागाची लोकसंख्या इतर लगतच्या प्रभागापेक्षा तीन ते चार हजाराने जास्त आहे. त्यामुळे मुलभूत सुविधा देण्याबाबत अडचणी येतील असे हरकतीत नमुद केले आहे.