प्रा. अशोक पाटील यांना पीएच.डी प्रदान

0

जळगाव – मु.जे. महाविद्यालयातील मानसशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक अशोक भिमराव पाटील यांना नुकतीच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे पीएच.डी. प्रदान करण्यात आली आहे. त्यांनी धुळे येथील प्रा. डॉ. जी.बी. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मूल्य आणि लैगिंक वर्तन अभिवृत्तीचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सामाजिक आर्थिक दर्जा या विषयावर शोध निबंध सादर केला होता. याबद्दल त्यांचे के.सी.ईचे अध्यक्ष नंदुकुमार बेंडाळे, प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी, मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ.सी.पी.लभाणे यांनी अभिनंदन केले आहे. प्रा.अशोक पाटील एरंडोल तालुक्यातील विखरण येथील असून गावातून पीएच.डी. करणारे पहिलेच व्यक्ती ठरले आहेत.