पुणे-चांदवड नाशिक येथील हिरालाल हस्तीमल जैन तंत्रनिकेतनमधील शिक्षक मान्यतेच्या चौकशीबाबत येथील माजी अध्यापक उदय वायकोळे यांनी वारंवार महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडे पाठपुरावा केला होता. येथील प्राचार्य यांच्या अहवालात अपात्र असल्याचा अहवाल सहसंचालक तंत्रशिक्षण नाशिक यांनी दिला होता त्याबाबत जनशक्तीने वृत्त प्रकाशित केले होते.
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण तंत्रशिक्षण मंडळ बांद्रा यांच्याकडे उदय वायकोळे यांनी वारंवार शिक्षक नियुक्या मधील गैरप्रकाराबाबत पाठपुरावा केल्यानंतर मंडळाने प्रकरणाची सखोल चौकशी करून शिक्षकांचे प्रस्ताव रद्द केल्याबाबतचे पत्र अध्यक्ष नेमिनाथ जैन तंत्रनिकेतन यांना दिले. त्यात स्पष्टपणे नमूद आहे की जहिरातीनुसार अटींचे पालन झाले नाही, तात्पुरत्या उमेदवारांना मान्यता देता येत नाही. तसेच मंडळाने वायकोळे यांना दिलेल्या पत्रात स्पष्ट नमूद केले आहे की सदर संस्थेतील शिक्षकीय पदांवरील नियुक्त्यांना मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव रद्द करण्यात आलेला आहे.