धुळे । महात्मा फुले जनशक्ती संघटनेच्या वतीने दिला जाणार्या ’माळी समाज जीवनगौरव पुरस्काराने’धुळे येथील महाजन हायस्कुल चे माजी प्राचार्य सुरेश चौधरी यांना गौरविण्यात आले. एस टी चौधरी सर हे खान्देश माळी महासंघाचे कार्यध्यक्ष असून माळी समाजात सामूहिक विवाह, वधू-वर मेळावे आयोजित करण्याचे काम करतात. तसेच माळी समाजात असलेल्या अनिष्ट रूढी परंपराचे निर्मूलन करण्याचे काम त्यांनी अविरत चालू ठेवले आहे. या कामाची दखल घेऊन पुरस्काराने सन्मानित केल्याचे निवड समितीचे अध्यक्ष तथा महात्मा फुले जनशक्ती संघटनेचे संस्थापक बाळासाहेब खेत्रे यांनी जाहीर केले.
कार्यक्रमात 18 जणांना पुरस्काराने गौरव
माळी समाजात प्रदीर्घ काळ सामाजिक कार्य करणार्या सामाजिक कार्यकर्त्यांना संघटनेच्या वतीने दरवर्षी ’माळी समाज जीवनगौरव पुरस्काराने’ गौरविण्यात येते. खान्देश माळी महासंघाचे कार्यध्यक्ष असून माळी समाजात सामूहिक विवाह, वधू-वर मेळावे या वर्षी 1 जानेवारी रोजी पुणे येथील महात्मा फुले सांस्कृतिक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात एकूण 18 जणांना पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याप्रसंगी ज्येष्ठ उद्योजक अरुंणभाऊ कुदळे, प्रवीण महाजन कोठलीकर, पी.के.महाजन, दशरथ कुलधरण, राखी रासकर, दीपक कुदळे, रोहिदास शिंदे, बाळासाहेब खेत्रे संघटनेचे कार्यकर्त् मोठ्या संख्येने उपस्थित होते.