प्रा. डॉ. अस्मिता पाटील भाजपच्या प्रदेश प्रवक्तापदी

0

महिला कार्यकर्त्यांमध्ये उत्साह; सर्वत्र अभिनंदन
चाळीसगाव- भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीमध्ये राज्यात धडाडीच्या महिला कार्यकर्त्यामध्ये काही मोजकीच नावे आहेत त्यात पाचोरा सारख्या ग्रामीण भागातून राज्याच्या संघटनेत प्रभावी कामगिरी करणार्‍या उच्च शिक्षित डॉ प्रा अस्मिता पाटील यांची भाजपच्या राज्य प्रवक्तापदी निवड झाल्याने महिला कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

सरकारचे धोरण मांडण्याची जबाबदरी
भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या प्रा डॉ अस्मिता पाटील गेल्या चार पाच वर्षयापासून त्यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाच्या प्रदेश संयोजिका म्हणून काम करताना त्याची खरी ओळख भाजपच्या राज्य पातळीवर पोहचली राज्य बालहक्क संरक्षण आयोग, राज्य ग्रंथालय समिती शिक्षण मंडळाच्या सदस्यपदी काम करतांना छाप पाडली. तसेच महाराष्ट्र राज्यातील महिला बचत गटाची मोट बांधली त्यातून महिला सक्षमीकरनाची मोठी जबाबदारी पार पाडली. जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोशियशनच्या अध्यक्ष व पाचोरा पीपल्स बँकेच्या संचालिका म्हणून त्यांच्या कामगिरीची दखल भाजपच्या वरिष्ठ नेत्यानी घेतली आहे. आर्थिक दुर्बल गटातील महिला, महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी मेळावे, स्त्री भ्रूण हत्ये बाबत जनजागृती ,सातारा ते पुणे पदयात्रा काढून व्यापक उपक्रम राबविलेत्याची दखल एबीपी माझा वृत्तवाहिणीने घेतली होती. अशा विविध पातळीवर कामगीरीमुळे प्रा डॉ अस्मिता पाटील यांची राज्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचाकडून महिला व बालविकासासाठी शासनाने राबविलेल्या धोरणाचा व भूमिका प्रभावी पणे माध्यमांकडे मांडण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ही जबाबदारी आपण अतिशय सक्षमपणे पार पाडू, असा विश्‍वास त्यांनी जनशक्ती शी बोलतांना व्यक्त केला आहे.