भुसावळ – जळगाव जिल्हा परीषदेच्या शिक्षण समितीच्या बैठकीत महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती, पुणे येथील मराठी विषयाचे अभ्यास मंडळ सदस्य डॉ. जगदीश पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव करून जिल्हा परीषद शिक्षण समिती अध्यक्ष पोपट भोळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भुसावळ नगरपालिका संचलित द. शि. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील उपशिक्षक डॉ. जगदीश लक्ष्मण पाटील यांची बालभारती अभ्यास मंडळ सदस्यपदी निवड झाली आहे. इयत्ता दहावी व आठवीच्या अभ्यासक्रम निर्मिती प्रक्रियेत त्यांचा सहभाग असल्याने दहावी मराठी पाठ्यपुस्तकात अभ्यास गट सदस्यात त्यांचे नाव आहे. या बाबीचा गौरव म्हणून जळगाव जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव बैठकीत मांडण्यात आला होता.
यांची होती उपस्थिती
गौरव प्रसंगी शिक्षण समिती सदस्य तथा जिल्हा परीषद सदस्य रवींद्र नाना पाटील, जिल्हा परीषद सदस्य हरीष पाटील, जिल्हा परीषद सदस्य रवींद्र पाटील, जिल्हा परीषद सदस्य गजेंद्र सोनवणे, जिल्हा परीषद सदस्या प्रमिला पाटील, जिल्हा परीषद सदस्य नंदा पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास महाजन, प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, उपशिक्षणाधिकारी डॉ.डी. एम.देवांग, उपशिक्षणाधिकारी ए.बी.गायकवाड यांच्यासह सर्व तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, शालेय पोषण आहार अधीक्षक उपस्थित होते.