प्रा. डॉ. वैशाली पाटील यांची निवड

0

हडपसर : रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी कॉलेजच्या प्रा. डॉ. वैशाली पाटील यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळाच्या सदस्यपदी निवड झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यापीठ अधिसभा व विद्यापरिषदेचे मंगळवारी निकाल जाहीर झाले.

या निवडणुकीसाठी महाविद्यालयाचे मा. प्राचार्य. डॉ. अरविंद बुरुंगले यांनी विशेष मार्गदर्शन केले. तसेच उपप्राचार्य डॉ. अशोक धुमाळ यांचेही सहकार्य मिळाले. पाटील निवडीबद्दल रयत शिक्षण संस्थेचे, चेअरमन डॉ. अनिल पाटील, सचिव प्रिं. डॉ. भाऊसाहेब कराळे, सहसचिव डॉ. विजयसिंह सावंत तसेच रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य दिलीप तुपे, चेतन तुपे, स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य अशोक तुपे, प्रदीप तुपे, प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले, उपप्राचार्य, डॉ. अशोक धुमाळ, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.