साक्री । मराठी कवितेत गेल्या पंधरा वषपासून कृषी परंपरेतील मुल्यांचे पोषण करणारा आवाज हरवल्याच्या नोंदी आहेत. पण त्या आवाजाला एक आश्वासक वळण कवी रावसाहेब कुवर यांच्या हरवलेल्या आवाजाची फिर्याद या काव्य संग्राहाने केली आहे. असे प्रतीपादन प्रा.डॉ.आशुतोषपाटील यांनी केले. साक्री येथील छत्रपती शिवाजी वाचनालयात औरंगाबाद येथील जेष्ठ समीक्षक प्रा.डॉ.सतिश बडवे यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. यावेळी त्यांनी समीक्षणातमक मत व्यक्त केले. कवी कमलाकर देसले(झोडगे) प्रा.डॉ.रमेश माने (अमळनेर), गुलाबराव देवरे (वासखेडी) आदींनी मनोगत व्यक्त केले.
अभिनंदनपत्राचे वाचन
यावेळी कवी रावसाहेब कुवर यांनी त्यांना मार्गदर्शन करणार्या गुरूजणांचे आभार व्यक्त केले. कवी म्हणुन दृष्टी देणारे कवी संतोष पवार यांचा विशेष उल्लेख करून सत्कार केला. प्रारंभी कवी नरेंद्र खैरनार यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर नांदेड येथील समीक्षक प्रा.केशव देशमुख यांच्या अंभिनंदन पत्राचे वाचन अनिता अहिरे यांनी केले. अध्यक्षस्थानी प्रा.एल.जी.सोनवणे होते. सूत्रसंचालन वृषाली खैरनार, कश्मिरा पाटील यांनी केले. यावेळी साधना कुवर, अनिकेत कुवर, राजन पवार, प्रफुल्ल सोनार, नितीन जगदाळे, विरेंदर बेंडसे, दिलीप लोखंडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.