शिरपूर । येथील आर.सी.पटेल फार्मसी येथील फार्माकोलोजी विभाग प्रमुख प्रा.डॉ. चंद्रगौडा रावसाहेब पाटील यांना केंद्रीय होमिओपॅथी अनुसंधान परिषद, आयुष मंत्रालय भारत सरकार यांचे तर्फे ’यंग सायंटिस्ट अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. केंद्रीय होमिओपॅथी अनुसंधान परिषद, आयुष मंत्रालय भारत सरकार यांचे तर्फे ’यंग सायंटिस्ट अवॉर्ड’ हा प्रदान सोहळा नवी दिल्ली येथे पार पडला. डॉ. पाटील यांना प्राप्त अवॉर्डचे स्वरुप 1 लाख रुपये धनादेश, सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र अशे स्वरूप होते. संपूर्ण भारतातून निवडक शास्त्रद्यांना हा पुरस्कार दिला जातो.देशभरातून समाजहित उपयोगी संशोधन करणार्या संशोधकांना प्रोत्साहन मिळण्या साठी आयुष मंत्रालयातर्फे असे अवॉर्ड्स दिले जातात.
आर.सी.पटेल फार्मसीतील फार्माकोलोजी विभागाचे प्रमुख
डॉ.पाटील यांनी बेसिक अँड फंडामेंटल रिसर्च इन होम्योपैथीक मेडिसिन या विषयावर संशोधन करून आंतरराष्ट्रीय स्तरावरती होम्योपैथी मेडिसिन चे महत्व उंचावले आहे. होम्योपैथीक मेडिसिन मुळे आर्थराइटिस, सांधे दुखी, इन्फ्लमेटोरी यां सारखे आजार बरे होतात हे डॉ. पाटील यांच्या संशोधन द्वारे स्पष्ट झाले आहे. मागील वर्षीच प्रा. डॉ. सी. आर. पाटील आणि त्यांच्या रिसर्च टीम नी नेचरसारख्या जगप्रसिद्ध नियतकालिकामध्ये शोध निबंध प्रसिद्ध केले आहेत. त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुराणा, उपप्राचार्य डॉ. अतुल शिरखेडकर, सर्व प्राध्यापकांनी कौतुक केले आहे.