प्रा. निलेश गायकवाड समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

0

तळोदा । तळोद्यातील महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. निलेश उत्तम गायकवाड यांची शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत त्यांची समाजभूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली .अहमदनगर येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांना समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. महाराष्ट्र राज्यातील एकुण 27 व्यक्तींची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली होती.राज्यातील सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, कृषी, राजकीय व संशोधन क्षेत्रात कार्य करणार्‍यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रा. निलेश गायकवाड यांच्या या पुरस्कारामुळे तळोदा कॉलेज ट्रस्टचे अध्यक्ष सुदाम पटेल, उपाध्यक्ष सुधीरकुमार माळी, कोषाध्यक्ष नरेंद्र पटेल, सुरेश सुर्यवंशी, निखिल तुरखिया, पी. पी. भोगे तसेच कॉलेज ट्रस्ट व्यवस्थापन समितीचे सदस्य, प्रा. डी. एम. माळी, प्राचार्य पी. व्ही. रामैय्या, सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर वृंद यांनी त्यांचे कौतुक केले.