प्रा. मोरे प्रेक्षागृहाचा पडदा आजपासून उघडला

0

दुरूस्तीनंतर रसिकांच्या सेवेत सुरू

चिंचवड : प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह एक मेपासून दुरुस्तीसाठी बंद ठेवले होते. प्रत्यक्ष कामाला 10 मे पासून सुरुवात झाली. आजपासून रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह रसिकांच्या सेवेसाठी सुरु झाले. रसिकांनी दिवाळी पहाट कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. सहशहर अभियंता प्रवीण तुपे म्हणाले की, प्रेक्षागृहात तालमीसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. व्हीआयपी रुम मोठा केला आहे. त्याशिवाय रंगमंच आणि बाल्कनीतील व्यवस्था , विद्युत यंत्रणा आदी सर्व सुविधा पूर्ण केल्या आहेत. प्रेक्षागृहातील स्थापत्य व विद्युतविषयक कामांसाठी 18 कोटी रुपये खर्च मंजुर आहे. खुर्च्यांचे नूतनीकरण केले आहे. प्रेक्षागृहांच्या दर्शनी बाजूला म्युरल्स बसविण्याचे नियोजन बाकी आहे.

प्रवेशद्वाराच्या सुरुवातीलाच संगीत क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींची चित्रे रेखाटण्यात आली आहेत. ज्येष्ठ पार्श्‍वगायिका लता मंगेशकर, आशा भोसले महेश काळे यांच्यासह सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गजांची चित्र रेखाटण्यात आली आहेत. नवीन खुर्च्या, पार्किंगची सुसज्ज व्यवस्था, अत्याधुनिक सीसीटिव्ही यंत्रणा, बाल्कनी, साऊंड सिस्टिममध्ये सुधारणा करण्यात आली आहे. महापालिकेच्यावतीने वेळोवेळी लक्ष ठेवण्यात येणार असून उर्वरित कामे लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.