प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयातर्फे मिनी मॅरेथॉन, रॅली उत्साहात

0

पिंपरी-चिंचवड : विद्यार्थ्यांमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय व श्री म्हाळसाकांत माध्यमिक व ÷उच्च माध्यमिक विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी मिनी मॅरेथॉन स्पर्धा व जनजागृतीपर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता. ही स्पर्धा चार गटात पार पडली. त्यात 18 वर्षाखालील मुले, 18 वर्षाखालील मुली, 18 वर्षावरील मुले व 18 वर्षावरील मुली असे गट होते. सकाळी साडेसात वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक राजू मिसाळ, अमित गावडे, सुमन पवळे, निलेश पांढारकर, वैशाली काळभोर, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव अ‍ॅड. संदीप कदम, अ‍ॅड. मोहनराव देशमुख, ए. एम. जाधव, डॉ. एम. जी. चासकर, मुख्याध्यापक अन्सार शेख, मुख्याध्यापिका अंजली फर्नांडिस, मुख्याध्यापक रमेश कुसाळकर, शैलजा गायकवाड उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. शरद सस्ते यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. ज्ञानेश्वर चिमटे यांनी केले.

असा होता स्पर्धेचा मार्ग
मिनी मॅरेथॉन स्पर्धा प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयापासून सुरू झाली. ती पुढे म्हाळसाकांत चौक, भेळ चौक, संभाजी रोड, बिजलीनगर ब्रिज कॉर्नर या मार्गाने परत महाविद्यालयात समाप्त झाली. या मॅरेथॉनमध्ये पर्यावरणाचा संदेश, सामाजिक संदेश देणार्‍या फलकांसह श्री. म्हाळसाकांत विद्यालयाचे व प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी सहभागी झाले होते.

स्पर्धेचा निकाल असा
या स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या प्रत्येक गटातील विद्यार्थ्याला प्रथम तीन हजार, द्वितीय दोन हजार तर तृतीय एक हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. 18 वर्षाखालील मुलांच्या गटात प्रथम तेजस मिसाळ, द्वितीय तेजस ससाणे, तृतीय आर्यन निवजेकर. 18 वर्षाखालील मुलांच्या गटात प्रथम शुभांगी मिश्रा, द्वितीय मानसी देसले, तृतीय परवीन शेख. 18 वर्षांवरील मुलांच्या गटात प्रथम विश्‍वास गायकवाड, द्वितीय अमर सकट, तृतीय कौस्तूभ आदक तसेच 18 वर्षांवरील मुलींच्या गटात प्रथम आरती काळोखे, द्वितीय तेजल पाटील, तृतीय तेजस्विनी गुळूंजकर यांनी यश मिळवले.