निगडी : विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड वाढावी, त्यांना विविध पुस्तकांची माहिती व्हावी यासाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयामध्ये ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सुयोग बुक एंटरप्रायजेस यांच्या सहकार्याने हे प्रदर्शन भरवण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य डॉ. एन. आर. दांगट, डॉ. तुषार शितोळे, मराठी विभाग प्रमुख प्रा. अपर्णा पांडे, संगिता लांडगे, प्रा. मिश्रा उपस्थित होते.
वाचनाची आवड लागेल
डॉ. चासकर म्हणाले की, विद्यार्थ्यांना अशा ग्रंथ प्रदर्शनांची गरज असते. त्यातूनच विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लागते. विचार करण्याची क्षमता वाढते. चांगले-वाईट याचा विचार करता येता. तसेच प्राध्यापकांनाही विविध पुस्तके हातळायला मिळतात. महाविद्यायातील विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनी या उपक्रमाचा उपयोग करून घ्यावा. ग्रंथ प्रदर्शनामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, अर्थशास्त्र, भूगोल, स्पर्धापरीक्षा, मानसशास्त्र, पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र, गणित, संख्याशास्त्र, संगणकशास्त्र आदी विषयांची पुस्तके ठेवण्यात आली होती. प्रदर्शनाचे आयोजन ग्रंथपाल प्रा. अंकुशजाधव, ग्रंथालय स्टाफ लोंढे, के. एस. पाटील, एस. पी. ठाकरे, सुखदेव लोखंडे, राजू ननावरे, सचिन इंदुरे, मंगल जंबुकर, किरण कळमकर, कल्याण मुंडे यांनी केले.