प्रा.विकास सपकाळे यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने सत्कार

0

शेंदुर्णी । येथील गरुड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे जीवशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक व्ही.वाय.सपकाळे हे 35 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते निवृत्त झाले. त्यानिमित्ताने त्यांचा भावपूर्ण निवृत्ती समारंभ शिक्षण संस्था, सहकारी शिक्षक, विद्यार्थी, आप्तेष्ट नातेवाईक यांच्यातर्फे गरुड माध्यमिक विद्यालयात पार पडला. अध्यक्ष स्थानी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय गरूड होते तर प्रमुख पाहुणे जि.प.चे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, गरूड महाविद्यालयाचे प्रा.डॉ. वासुदेव पाटील, पं.स.सदस्य डॉ.किरण सूर्यवंशी, पं.स.माजी सदस्य सुधाकर बारी, शांताराम गुजर, संस्था सचिव सागरमल जैन, संचालक उत्तमराव पाटील, पटेल सर, माजी मुख्याध्यापक ए.टी.चौधरी उपस्थित होते.

सपकाळे यांनी व्यक्त केल्या भावना
गरूड महाविद्यालयाचे पर्यवेक्षक सुहास संघवी यांनी आपल्या प्रास्ताविकात प्रा. विकास सपकाळे यांच्या कार्याचा गौरव केला. सत्काराला उत्तर देताना प्राध्यापक सपकाळे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, सहकारी शिक्षक, व गावकरी मंडळी विषयी ऋण व्यक्त केले. तसेच यापुढेही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत राहणार असल्याचे सांगितले, कार्यक्रम सूत्रसंचालन कुमावत यांनी केले.