प्रा.समीर घोडेस्वार यांना राज्यस्तरीय गुणवंत क्रीडा शिक्षक” पुरस्कार

जामनेर :-  जामनेरपुरा येथील इंदिराबाई ललवाणी कनिष्ठ महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक प्रा.समीर विष्णू घोडेस्वार यांची शैक्षणिक क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्याची दखल घेत  राजनंदिनी बहुद्देशीय संस्था यांच्या वतीने  “राज्यस्तरीय गुणवंत क्रीडा शिक्षक पुरस्कार -२०२२”  ने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळा छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय, जळगाव येथे आज नुकताच संपन्न झाला.
              समारंभ प्रसंगी , म.न.पा.सहायक आयुक्त उदय पाटील,  साहित्यिक प्रा.डॉ.शैलेंद्र भणगे (औरंगाबाद),   माजी संचालिका ग.स.सोसायटी कल्पना पाटील,  सिंगल वुमन्स फाउंडेशन अध्यक्षा मीनाक्षी चव्हाण ,  शिक्षण अधिकारी संभाजी पाटील ,  शिक्षण विस्तार अधिकारी रागिनी चव्हाण,   जि.प.आदर्श शिक्षिका शासन पुरस्कार प्राप्त तथा उपशिक्षिका कांचन राणे ,   जि. प.शासन पुरस्कार प्राप्त तथा क्रीडा शिक्षक प्रवीण पाटील,   राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था अध्यक्षा संदीपा वाघ,   संचालक ज्ञानेश्वर वाघ ,  हिंदी उपशिक्षक प्रशांत सोनवणे (नवापूर),  इंदिरा कन्या प्रा.सुधीर शिरसाठ(धरणगाव),  ललित पारधे यांच्या प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या हस्ते  सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, बुके  देऊन गौरविण्यात आले*