भुसावळ : बदलत्या युगात प्रिंट मिडियापुढे डिजिटल माध्यमाने आव्हान उभे केले असलेतरी बदलत्या काळातही प्रिंट मिडियाचे महत्व व विश्वासार्हता अबाधीत असेल, असे मत सरकारी वकील व ज्येष्ठ पत्रकार अॅड.नितीन खरे यांनी येथे व्यक्त केले. भुसावळ रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीतर्फे आयोजित कार्यक्रमात ‘प्रिंट मिडियाचे महत्व’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी क्लबचे अध्यक्ष हरविंदरसिंग ठेठ्ठी, माजी सचिव विशाल शहा, प्रोजेक्ट चेअरमन श्रीकांत जोशी व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रिंटची विश्वासार्हता आजही टिकून
अॅड.खरे पुढे म्हणाले की, आज इलेक्ट्रॉनिक, सोशल व डिजीटल मिडीयाचा सर्वत्र बोलबाला आहे पण विश्वासाहर्ता प्रिंट मिडिया टिकवून आहे. डिजिटल मिडीयावर कितीही बातम्या पाहिल्या तरी पेपर वाचल्याशिवाय समाधान होत नाही त्यामुळे प्रिंट मिडियाचे अस्तित्व कोणीही मिटवू शकणार नाही. भुसावळसारख्या शहरातून काम करणार्या पत्रकारांनी प्रिंट मिडीयात उत्कृष्ट काम करुन आपला वेगळा ठसा उमटवल्याचे अॅड.खरे म्हणाले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार संजयसिंग चव्हाण, क्लबचे आगामी अध्यक्ष डॉ. मकरंद चांदवडकर यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प्रिंट मिडीयात काम करणार्या पत्रकारांचा रोटरीचे माजी सहाय्यक प्रांतपाल चेतन पाटील, डॉ.नितीन दावलभक्त, मंगेश यावलकर, डॉ.प्रवीण वारके, महेंद्र (सोनू) मांडे, पंकज भंगाळे आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. क्लबचे अध्यक्ष हरीविंदरसिंग ठेठ्ठी यांनी प्रास्ताविक केले. प्रोजेक्ट चेअरमन श्रीकांत जोशी यांनी उपक्रमाची माहिती दिली. विशाल शाह यांनी आभार मानले. क्लबचे सचिव आशिष अग्रवाल, पुरुषोत्तम पटेल, रणजीत खरारे आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले.