प्रियंका आणखी एका हॉलिवूडपटात

0

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आता हॉलिवूडवर कब्जा करणार असल्याचे म्हटले तर वावग ठरणार नाही. कारण आता नुकताच तिने आणखी एक हॉलीवूड नवा चित्रपट साइन केला असून यात ती वकिलाच्या भूमिकेत आपल्यला दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘बेवॉच’चा दिग्दर्शक सेठ गोर्डन करणार आहे तर चित्रपटाची निर्मिती प्रियंकाची मैत्रीण मुबिना रेटोसन करत आहे. या चित्रपटात प्रियंका आपल्या मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. प्रियंका सध्या दोन हॉलीवूड चित्रपटांमध्ये व्यस्त आहे.

अ किड लाइक जेक आणि इट्स इजंट रोमँटिक या दोन चित्रपटांमध्ये बिझी आहे. दुसर्‍या चित्रपटात ती योगा अँबेसिडर आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय चित्रपटसृष्टीचं नाव आणखी एका कारणामुळे गाजत आहे, ते म्हणजे अभिनेत्री प्रियंका चोप्रा. बॉलिवूडमध्ये नावारुपास आल्यानंतर प्रियंकाने हॉलिवूडमध्येही पदार्पण करत आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘क्वांटिको’ या सीरिजमधून तिचा चेहरा अनेकांच्याच ओळखीचा झाला. या क्षेत्रात तिचा आतापर्यंतचा प्रवास बराच रंजक राहिलाय. सध्याच्या घडीला सर्वाधिक मानधन घेण्यार्‍या अभिनेत्रींच्या यादीतही तिच्या नावाचा समावेश आहे. अशा या ‘देसी गर्ल’चे काही जुने फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.