प्रियंका गांधींमुळे मोदीमुक्त वाराणसी आणि योगीमुक्त गोरखपूर होणार-कपिल सिब्बल

0

लखनौ- प्रियंका गांधी यांच्या राजकारणात औपचारिक प्रवेश केला आहे. प्रियांका गांधी यांची कॉंग्रेस महासचिवपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या निवडीमुळे कालपासून राजकीय तर्क-वितर्कांना उत आले आहे. उत्तर प्रदेशात मोदी-शहाला शह देण्यासाठीच काँग्रेसने ही खेळी खेळल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी ट्विट करत प्रियंका आल्यामुळे आता मोदीमुक्त वाराणसी आणि योगीमुक्त गोरखपूर होणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या दोन मतदारसंघातून प्रियंका निवडणूक लढवणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.

आपल्या ट्विटमध्ये त्यांनी मोदी आणि शहा यांनी काँग्रेसमुक्त भारताचे आवाहन केले होते. मात्र, आता प्रियंका गांधी उत्तर प्रदेशच्या राजकारणात दाखल झाल्यामुळे मोदीमुक्त वाराणसी आणि योगीमुक्त गोरखपूर असे चित्र दिसणार आहे असे कपिल सिब्बल यांनी सांगितले आहे.