प्रियंका पुन्हा हॉलिवूडकडे

0

हॉलिवूडमध्ये आपला करिष्मा दाखवण्यासाठी देशी गर्ल प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा विदेशात परतली आहे. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने काही दिवस का होईना मायदेशी आलेली ही देशी गर्ल पुन्हा अमेरिकेला रवाना झाली आहे. आता यावेळी ती तिथे आपल्या दोन हॉलिवूड चित्रपटांचे शूटिंग पूर्ण करणार आहे.

अमेरिकन टीव्ही शो क्वांटिकोचे दोन भाग आणि आणि बेवॉच सारखा सिनेमा केल्यानंतर प्रियांका चोप्राचे हॉलिवूडमधील वजन चांगलेच वाढले आहे यात वाद नाही. यामुळे खीप’ीं ळीं ठेारपींळल आणि – घळव श्रळज्ञश गरज्ञश सारखे आणखी 2 मोठे चित्रपट मिळाले आहेत. वाढदिवसाच्या निमित्ताने सुट्टीवर गेलेल्या प्रियांकाने माल्दिव्समध्ये सुट्टीचा पुरेपूर आनंद घेतला. आता ती पुन्हा एकदा सुट्टी संपवून कामावर परतत आहे. विदेशी जाताना निळ्या रंगाचा ऑफ-शोल्डर गाउन, फ्लॉवर प्रिंटेड कार्डिगन आणि ब्लॅक हिल्समध्ये प्रियांका दिसून आली. एअरपोर्टवर हसत खेळत आलेल्या प्रियांकाने तितक्याच आनंदात बाय बाय केले. हल्ली प्रियांका चोप्राचे शेड्युल्ड खूप बिझी झाले असून, भारतात परतल्यावरही ती व्यस्त असल्याचेच दिसून आले. सर्वात आधी तिने परतल्यानंतर आपल्या प्रॉडक्शन हाउसची आणि सुरू असणार्‍या सिनेमांची माहिती करून घेतली. त्यानंतर आई मधु आणि भाऊ सिद्धार्थसोबत ती वाढदिवसाच्या निमित्ताने सुट्टीसाठी माल्दिव्सला गेली. तिने सुट्टीच्या घेतलेल्या मनमुराद आनंदाला फोटोमध्ये बंदिस्त केल्याचे ती सांगते. मात्र, विदेशी चित्रपटासाठी गेलेल्या प्रियांकाची वाट भारतीय फिल्म मेकरही पाहत आहेत, हे तिने विसरायला नको.