प्रियकरासह त्याच्या पित्याने केला अल्पवयीन तरुणीवर अत्याचार

First, a young girl from Warangaon area was kidnapped ; Later, the lover was also raped by the murderous father भुसावळ : तालुक्यातील वरणगाव परीसरातील एका खेड्यातील अल्पवयीन तरुणीला आमिष दाखवून प्रियकराने पळवून नेले मात्र नंतर या प्रियकराने व नंतर त्याच्या पित्यानेदेखील असहाय तरुणीवर अत्याचार केल्याची संतानजनक बाब उघडकीस आली. वरणगाव पोलिसांनी या प्रकरणी पिता-पूत्रांना बेड्या ठोकल्या आहेत.

फेसबुकवरून झाली मुलासोबत ओळख
वरणगाव परीसरातील एका गावातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीची फेसबुकवर एका मुलासोबत ओळख झाली. यातून दोघांमध्ये प्रेम उभरले. दोघे जण 29 सप्टेंबर रोजी घरातून पळून गेले. मुलगी उशिरापर्यंत घरी न आल्यामुळे मुलीच्या वडीलांनी पोलिसात तक्रार दिली होती. सहाय्यक निरीक्षक आशिष आडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार नरसिंग चव्हाण व त्यांच्या सहकार्‍यांनी गुजरातमधील सोरटी सोमनाथ येथून या दोघांना ताब्यात घेतले. मुलीला बाल कल्याण समितीकडे सोपवले.

बाल कल्याण समितीकडे पिडीतेचा धक्कादायक जबाब
या समितीकडे मुलीने धक्कादायक जबाब दिला आहे. प्रियकर व वडिलांनी आपल्यावर अत्याचार केल्याचे तिने सांगितले. यावरून वरणगाव पोलिसात प्रियकर व मुलीच्या बापाविरुद्ध पोस्को कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांना अलीकडेच पोलिसांनी अटक केली. पुढील तपास उपनिरीक्षक परशुराम दळवी हे करीत आहेत.