प्रियदर्शनी एससी, चिखलवाडी यंग बॉईज, हॉकी लव्हर्स संघांचा विजय!

0

पिंपरी : सुरेंद्र आनंद हॉकी महाराष्ट्र लीग 2016-17 स्पर्धेत प्रियदर्शनी एससी, चिखलवाडी यंग बॉईज व हॉकी लव्हर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून आगेकूच केली. पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत ‘अ’ गटाच्या सामन्यात प्रियदर्शनी एससी संघाने खडकी स्पोर्टस् अ‍ॅकॅडमीचा 4-2 असा सहज पराभव केला. प्रियदर्शनीकडून अथर्व कांबळे याने तीन गोल तर, मनोज पिल्ले याने एक गोल केला. खडकी स्पोर्टस् अ‍ॅकॅडमीकडून अक्षय जाधव व निखिल भोसले यांनी गोल केले. या विजयानंतर प्रियदर्शनी संघाचे 18 गुण झाले आहेत.

फे्रन्डस् युनियन संघ पराभूत
चिखलवाडी यंग बॉईज संघाने फ्रेन्डस् युनियनवर 4-3 असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. चिखलवाडीकडून आदित्य रसाळ याने दोन तर, तुषार दुर्गा व सेल्वराज पिल्ले यांनी एकेक गोल केले. फ्रेन्डस् युनियनकडून शक्ती ठाकूर, विजय महाबडी व अमर ठाकूर यांनी प्रत्येकी एक गोल केले. चिखलवाडी संघाचा हा पहिलाच विजय ठरला व त्यांनी पाच गुणांची कमाई केली. फ्रेन्डस् युनियन संघाला दुसर्‍या पराभवाला सामोरे जावे लागले व त्यांचे एकूण 25 गुण झाले आहेत. दरम्यान, हॉकी लव्हर्स संघाने सेंट जोसेफ संघाचा 8-3 असा सहज पराभव करून आगेकूच कायम ठेवली. कौस्तुभ आंबेकर याने दोन तर, वैभव तेलंगी, प्रथम अंगीर, आकाश बेलिटकर, मयूर जाधव, हितेश बेलिटकर व निखिल गोरटकर यांनी प्रत्येकी एक गोल केले.

स्पर्धेचा निकाल असा
कुमार विभाग : गट ‘अ’ 1) प्रियदशर्नी एससी : 4 (अर्थव कांबळे 4, 17, 29 मि., मनोज पिल्ले 49 मि.) विजयी विरुद्ध खडकी स्पोर्टस् अ‍ॅकॅडमी : 2 (अक्षय जाधव 2 मि., निखिल भोसले 48 मि.); हाफ टाईम : 2-1. 2) चिखलवाडी यंग बॉईज : 4 (आदित्य रसाळ 2, 44 मि., तुषार दुर्गा 28 मि., सेल्वराज पिल्ले 37 मि.) विजयी विरुद्ध फ्रेन्डस् युनियन : 3 (शक्ती ठाकूर 3 मि., विजय महाबडी 24 मि., अमर ठाकूर 31 मि.); हाफ टाईम : 4-3. 3) हॉकी लव्हर्स : 8 (वैभव तेलंगी 4 मि., कौस्तुभ आंबेकर 15, 32 मि., प्रथम अंगीर 22 मि., आकाश बेलिटकर 23 मि., मयूर जाधव 24 मि., हितेश बेलिटकर 42 मि., निखिल गोरटकर 46 मि.) विजयी विरुद्ध सेंट जोसेफ प्राईड : 3 (कार्तिक वीरमणी 45 मि., हर्ष परमार 13, 49 मि.); हाफ टाईम 5-1.