अंबाजोगाईत ‘बालझुंबड-2019’ चे 7 ते 13 जानेवारीला आयोजन

0

बालझुंबड उपक्रमात तालुक्यातील विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे – संयोजक राजकिशोर मोदी

अंबाजोगाई : प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी प्रियदर्शनी क्रीडा, सांस्कृतिक व व्यायाम मंडळाच्या वतीने ‘बालझुंबड-2019’ चे आयोजन  शहरात दिनांक 7 ते 13 जानेवारी 2019 या कालावधीत करण्यात आले आहे. दरवर्षी बालझुंबड हा उपक्रम तालुकास्तरावर आयोजित करण्यात येतो. यावर्षीही अंबाजोगाई तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी बालझुंबड उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन प्रियदर्शनी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष राजकिशोर मोदी व सांस्कृतिक विभागप्रमुख दिनकर जोशी यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

प्रसिद्धीपत्रकात राजकिशोर मोदी व दिनकर जोशी यांनी नमुद केले आहे की, गेल्या 18 वर्षापासून बालझुंबड हा उपक्रम अंबाजोगाई शहरातील सर्व शाळांच्या सहकार्याने यशस्वीपणे राबविण्याचा प्रयत्न करीत आहोत. बालझुंबडचे हे 19 वे वर्ष आहे. हा उपक्रम तालुकास्तरावर आयोजित केला जात असल्यामुळे त्यासाठी आवश्यक ते सर्व नियोजन करण्यात येत आहे. अंबाजोगाई तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी यातुन मिळणार आहे. क्रिडा मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते विद्यार्थ्यांच्या स्वागताच्या तयारीत असुन उपक्रम शिस्तबद्धरित्या पार पाडण्यासाठी सज्ज झाले आहेत. स्पर्धेचे वैशिष्ट्यपुर्ण नियोजन करून यावर्षी तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी संयोजक प्रयत्नशील आहेत.

सामान्यज्ञान, निबंधलेखन, क्वीझकाँम्पिटीशन, चित्रकला, रंगभरण, कथाकथन, वक्तृत्व, पी.पी.टी.काँम्पिटीशन, वैयक्तिक नृत्य, समुहनृत्य आदी सात विविध स्पर्धांचे यशस्वी आयोजन हे बालझुंबडचे वैशिष्ट्ये आहेत. स्पर्धकांनी आपले प्रवेश निश्चित करण्यासाठी आपल्या शाळेतील मुख्याध्यापक यांचेशी संपर्क साधुन दि.04 जानेवारी 2019 पर्यंत आपला प्रवेश नोंदवावा. स्पर्धेच्या अधिक माहिती व स्पर्धेतील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी,पालकांनी व शिक्षकांनी संपर्क क्र.02446- 248753/9421341688 समन्वयक चंद्रकांत गायकवाड 9860666938, आनंद टाकळकर 9850591061 जोधाप्रसादजी माध्यमिक विद्यालय गुरूवारपेठ, अंबाजोगाई येथे संपर्क साधावा असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.