मुंबई : प्रियांका चोप्रा आणि निक जोनास दोघेही आपल्या लग्नाची जोरदार तयारी करत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी प्रियांकाने अमेरिकेत खास प्रिवेडिंग ब्रायडल शॉवरचे सेलिब्रेशनही केले आहे. अशातच तिने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
प्रियांका बऱ्याचदा आपल्या कुटुंबातील फोटो शेअर करत असते. अशाच एक फोटो तिने शेअर केला असून त्यात निक प्रियांकाच्या लहान भाच्यासोबत खेळताना दिसत आहे. हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.