प्रियांकाच्या होणाऱ्या सासऱ्यांवर कोट्यवधींचे कर्ज?

0

नवी दिल्ली:अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनास यांच्या साखरपुड्यानंतर तिच्या फॅन्सना आतुरता आहे ती त्यांच्या लग्नाच्या तारखेची. पण याच दरम्यान निकचे वडील आणि प्रियांकाचे होणारे पॉल जोनास यांच्या एका रियल इस्टेट कंपनी वर एक मिलियन डॉलर म्हणजे जवळपास ७ कोटी १० लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहे. ज्यात २ लाख ६८हजार डॉलर्स म्हणजे जवळपास एक कोटी ९० लाख रुपयांचा दावा असलेला एक खटलाही समाविष्ट आहे. हा खटला त्यांची कंपनी हरली होती.

माहितीनुसार, पॉल जोनास पैशांसाठी आता आपली न्यूजर्सी कन्स्ट्रक्शन आणि रियल इस्टेट कंपनीची संपत्ती विकण्याच्या तयारीत आहेत. याअगोदर निक सोबत जोनास ब्रदर्सनी २०१३ मध्ये बॅण्ड बंद होण्याआधी जगभरात आपले लाखो रेकॉर्डस् विकले होते. त्यानंतर त्यांनी वैयक्तिक काम करायला सुरुवात केली.