प्रियांकाने ‘भारत’ चित्रपट सलमानमुळे सोडला

0

मुंबई: प्रियांका चोप्राने सलमान खानचा ‘भारत’ चित्रपट सोडून जवळपास महिना उलटला आहे. मात्र प्रियंकाने हा चित्रपट नेमका का सोडला, यावर अनेक तर्कवितर्क लावले गेले. निकसोबतच्या साखरपुड्याचे मुख्य कारण तिने भारत सोडण्यामागे दिले होते. पण आता अशी चर्चा सुरु व आहेत, की प्रियांकाने हा चित्रपट सलमान खानमुळेच सोडला आहे.

सलमानचा सेटवर उशिरा येण्याचा स्वभाव प्रियंकाला माहीत होता. सलमान दरवेळी चित्रपटाच्या सेटवर उशिरा पोहचतो, यामुळे प्रियांकाच्या हॉलिवूड प्रोजेक्ट्सला नुकसान पोहचण्याची शक्यता होती. त्यामुळे प्रियांकाने या चित्रपटातून काढता पाय घेतला.