मुंबई: रोका नंतरचा निक जोनस आणि प्रियांका चोप्राचा हा पहिला फोटो त्यांच्या चाहत्यांच्या भेटीला आलं आहे. हा फोटो पाहून तुम्हाला हे तर नक्कीच लक्षत आलं असेल की प्रियांका लग्न भारतीय परंपरे नुसार करणार आहे.
रोकाच्या कार्यक्रमाला प्रियंकाने पिवळा रंगाचा ड्रेस तर निक जोनसनेही कुर्ता पजमा घालून भारतीय संस्कृती बद्दल आपुलकी असल्याचे दिसून आले. दोघेही अत्यंत खुश दिसत आहेत. हा कार्यक्रम अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. चोप्रा आणि जोनास कुटूंबांचे जवळचे नातेवाईक या कार्यक्रमात आले होते. मात्र आज संध्याकाळी अन्य बॉलीवूडचे मित्रांसाठीही एक मोठी पार्टी ठेवण्यात आलीये अशी चर्चा सुरु आहे.