न्यू यॉर्क: प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या साखरपुड्यानंतर दोघेही एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसतात आणि नुकताच काल म्हणजेच रविवारी १६ सप्टेंबरला निकचा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसानिमीत्त प्रियांकाने ग्रॅन्ड पार्टी सेलेब्रेट केली. पार्टीनंतर निकच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनवेळी निकने सर्वांसमोर प्रियांकाला किस केले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
त्यांच्या फोटोंना व व्हिडिओना चाहतेही प्रचंड लाईक करत असतात. निकचा वेगळा लूकही यावेळी सर्वांना पाहायला मिळााला. त्याच्या टी-शर्ट वरील ‘नमस्ते’ हा शब्द सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.