प्रियांका आणि निक अनाथाश्रमात

0

मुंबई – नुकतच प्रियांका आणि निक जॉनचा मुंबईत साखरपुडा पार पडला. यानंतर ते दोघेही मुंबईचे सेंट कॅथरिन ओर्फनेज अनाथाश्रमात भेट देण्याकरता गेले होते. तिथे निकने लहान मुलांसाठी गाणी गायले. तिथलाच एक व्हिडिओ प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

निक गाणे गाताना प्रियांका त्याला बघून लाजताना दिसत आहे. प्रियांका व निक अनाथाश्रमात गेल्यानंतर तेथील लहानमुलांबरोबर त्यांनी भरपूर वेळ घालवला. तसेच प्रियांकाने या मुलांसोबत तिच्या ‘गुंडे’ चित्रपटातील ‘तुने मारी एन्ट्री यार’ या गाण्यावर डान्सही केला.