प्रियांका गांधींना डेंग्यू

0

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची मुलगी प्रियांका गांधी-वाड्रा यांना डेंग्यू झाला आहे. प्रियांका यांच्यावर 23 ऑगस्टपासून दिल्लीच्या श्री गंगाराम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयाच्यावतीने डॉ. डी. एस. राणा यांनी ही माहिती दिली. ताप आला आणि अशक्तपणा जाणवू लागला म्हणून प्रियांका यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत त्यांना डेंग्यू झाल्याचे लक्षात आले. वेळीच उपचार सुरू झाल्यामुळे प्रियांका यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे, असे डॉ. राणा म्हणाले. याआधी काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनाही आठवडाभर तापामुळे सक्तीची विश्रांती देण्यात आली होती.