प्रियांका चतुर्वेदी यांच्या तक्रारीनंतर गृह मंत्रालयाकडून चौकशीचे आदेश

0

मुंबई-काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांना मुलीवर बलात्कार करु अशी धमकी ट्विटरवरुन देण्यात आली होती. याप्रकरणी मुंबईच्या गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना अज्ञात व्यक्तीविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला. चतुर्वेदी यांनी स्वतः मुंबई पोलिसांकडे ट्विटरद्वारे धमकीबाबत तक्रार केली होती. यापूर्वी प्रियंका चतुर्वेदी यांना धमकी प्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाने मुंबई पोलिसांना कसून तपास करण्याचा आणि गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता.

धमकी देणाऱ्याची ओळख पटवा आणि त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश गृह मंत्रालयाकडून देण्यात आले होते. … या ट्विटर हँडलवरुन चतुर्वेदी यांना ही धमकी देण्यात आली होती. धमकी देणाऱ्याच्या ट्विटर अकाऊंटचे नाव ‘जय श्री राम’ असे होते. मंदसौर बलात्कार प्रकरणी व्हायरल होत असलेल्या एका खोट्या मेसेजप्रकरणी चतुर्वेदी यांना धमकावण्यात आले.