प्रियांका चोप्राच्या लग्नाची तारीख ठरली

0

मुंबई- प्रियांका चोप्रा आणि निक जोनास लग्न करणार आहे. दोघांचा साखरपुडा देखील झाला. दरम्यान आता त्यांच्या लग्नाची तारीख ठरली असून 30 नोव्हेंबरपासून 2 डिसेंबरपर्यंत लग्नाच्या वेगवेगळ्या विधी होणार आहे. लग्नाचे डेस्टिनेशन पाहण्यासाठी प्रियांका जोधपूरला आली होती.

प्रियांका आणि निक जोधपूरमध्ये लग्न करणार आहेत. आहेत. दोघे एका पॅलेसमध्ये वेडिंग करणार असल्याचे समजतेय. निक जोनस लग्नाच्या तयारीसाठी मुंबईत आला होता. प्रियांका आणि निकने लग्नाच्या तयारीची जबाबदारी स्वत: घेतली आहे प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीत दोघे कटाक्षाने लक्ष घालतायेत.

प्रियांका -निकचा 18 ऑगस्टला रोका झाला होता. विधिवत पार पडलेल्या या छोटेखानी सोहळ्याला दोघांच्याही कुटुंबातले काही मोजकेच लोक उपस्थित होते. त्यानंतर सगळ्यांचे लक्ष प्रियांकाच्या लग्नाकडे लागले होते अखेर लग्नाची तारीख ही पक्की झाली आहे. दोघींनीही आपआपल्या रितीरिवाजानुसार लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच भारतीय आणि अमेरिकन अशा दोन्ही पद्धतीने हे लग्न होणार आहे. प्रियांका- निकची ओळख गतवर्षी झालेल्या मेट गाला इव्हेंटमध्ये झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री- झाली या मैत्रीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले.