मुंबई: बॉलीवूडमध्ये सलमान खानला हुकूमका एक्का मानलं जातं. सलमानने बॉलिवूडमध्ये ब्लॉकबस्टर चित्रपट दिलेत. बॉलीवूडला अनेक नवीन उभारते अभिनेतेही दिले आहे. अनेक कलाकारांसाठी तो ‘गॉडफादर’ही ठरला आहे.
सलमानचा मेव्हणा आयुष शर्मा आता ‘लव्हयात्री’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. ‘लव्हयात्री’ चित्रपटाची निर्मीती सलमानच्या प्रॉडक्शन हाऊसमधून झाली असल्यामुळे, या चित्रपटाकडे सर्वांचे लक्ष आहे. याचबाबत बोलत असताना सलमान खानने एका मुलाखतीत म्हटले , की ‘बॉलिवूडमध्ये कुणाचा आधार घेऊन स्वत:ची ओळख निर्माण करता येत नाही. अभिनयाच्या जोरावरच आपण आपली वेगळी प्रतिमा तयार करू शकतो. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणेही महत्वाचे असते, कारण प्रेक्षकांमुळेच एखादा कलाकार सुपरस्टार बनू शकतो’.
बॉलिवूडचे अनेक चित्रपट सलमान खानच्या फक्त नावावरच सुपरहिट होतात. त्याचा ‘रेस ३’ हा चित्रपट याचे उत्तम उदाहरण आहे. पुढे सलमान असेही म्हणाला, की ‘मी फार नशीबवान आहे, की माझा हा चित्रपट फ्लॉप ठरूनही बॉक्सऑफिसवर या चित्रपटाने १०० कोटींची कमाई केली आहे’. आता आयुष आणि वारीना हुसेनचा ‘लव्हयात्री’ प्रेक्षकांचे मन जिंकण्यात कितपत यशस्वी ठरतो, हे पाहणे रंजक ठरेल.