प्रेताच्या विटंबनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी

0

फैजपूर : वडिलोपार्जित स्मशानभूमीच्या रस्त्यावर अतिक्रमण करून अडवणूक केल्याने प्रेताची विटंबना केल्याची घटना रावेर तालुक्यातील मोरगाव बु. येथे 15 डिसेंबर रोजी घडली होती. याबाबत इंद्रसिंग पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी फैजपूर उपविभागीय कार्यालयासमोर मयताचे कुटुंबियांनी उपोषण सुरु केले आहे.

जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करुनही दखल घेईना
रावेर तालुक्यातील मोरगाव बु. येथील रहिवाशी इंद्रसिंग पाटील यांची शेतजमीन गट क्रमांक 26 ही मोरगाव बु. शिवेला लागून मोरगाव खु. शिवारात आहे. परंतु पाटील यांनी दोघ गावचे जागेवर अतिक्रमण करून तारेचे पक्के कुंपण केलेले आहे आहे. या रस्त्यावरून ढिवरे कुंटुंबातील प्रेत जात होते. मात्र या रस्त्यावरून प्रेत जावू दिले नाही. आणि प्रेताची विटंबना केली आहे. संबंधीत व्यक्तीवर अनुसूचित जाती/ जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत इंद्रसिंग पाटील यांचेवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे लेखी स्वरुपात केली होती. यासंदर्भात 15 दिवस उलटून कोणतीही कारवाई अजूनपर्यंत न झाल्याने ढिवरे कुंटुंब 5 रोजी सकाळी 11 वाजेपासून उपविभागीय कार्यलयाजवळ बसलेले आहे. यात उपसरपंच किरण ढिवरे, गौतम ढिवरे, सुनील ढिवरे, रत्नाबाई ढिवरे, अर्चना ढिवरे यासह संपूर्ण कुटुंबियांचा समावेश आहे.