प्रेमप्रकरणातून विद्यार्थ्याची आत्महत्या

0

पिंपरी-चिंचवड: चर्‍होली येथील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने प्रेमप्रकरणात आलेल्या नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केली. विठ्ठल हणुमंत गडकर (वय 21, रा. चर्‍होली) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून तो एम. एस्सीचे शिक्षण घेत होता. पोलिसांना सुसाईड नोट मिळाली असून, दिघी पोलीस पुढील तपास करत आहेत.

गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चर्‍होली येथे राहणारा विठ्ठल गडकर हा पुण्यातील वाडिया महाविद्यालयात एम. एस्सी करत होता. प्रेमात आलेल्या नैराश्याने त्याने गळफास घेतला. त्याच्याकडे एक चिठ्ठी आढळून आली आहे. त्यामध्ये माझ्या आयुष्याला कंटाळून आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये, असे म्हटले आहे. तसेच एका मुलीला उद्देशून तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर बरे झाले असते, असे म्हटले आहे. त्यामुळे ही आत्महत्या प्रेमातून झाल्याचा पोलिसांना संशय आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी 5 वाजता समोर आली. पिंपरी-चिंचवडमधील यशवंत स्मृती रुग्णालयात त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. पुढील तपास दिघी पोलीस करत आहेत.