पिडीत गर्भवती ; रामानंदनगर पोलिसात तरुणाविरोधात अपहरणासह बलात्काराचा गुन्हा
जळगाव- शहरातील समता नगर येथील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून प्रेमप्रकरणातून पळविल्याची घटना रविवारी समोर आली आहे. याप्रकरणी पिडीतेच्या आईच्या फिर्यादीवरुन रामानंदनगर पोलिसात सागर उर्फ निहाल संजय शिंदे यांच्या विरोधात अपहरणासह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचेही समोर आले आहे.
आई, वडीलांचा घटस्फोट झाल्याने पिडीत हे वडीलांजवळ समतानगरात वास्तव्यास आहे. 1 रोजी पिडीतेला तिची आई भेटण्यासाठी तिच्या घरी गेली. यावेळी आईला मुलगी दिसून आली नाही. आईने मुलीच्या वडीलांना याबाबत विचारले असता, त्यांनी ती काही दिवसांपूर्वी घरी आली नसल्याची माहिती दिली. यानंतर पिडीतेच्या आईने शोध घेतला असता, 7 रोजी मुलगी सागर उर्फ निहाल संजय शिंदे याच्याकडे असलयचे माहिती मिळाली.
मुलगी म्हणाली 1 वर्षापासून प्रेमसंबंध
आईने मुलीला इथे कशी आली याबाबत विचारले असता, मुलीने माझे 1 वर्षापासून सागर शिंदे याच्यासोबत प्रेमसंबध असून तीन महिन्यांपासून त्याच्यासोबत राहत असल्याचे सांगितले. तसेच गर्भवती असल्याची गंभीर बाबही तिने सांगितली. सागर शिंदे याने लग्नाचे आमिष दाखवून मुलीला पळविले व तिच्या सोबत शारिरीक संबंध ठेवून गर्भवती केल्याबाबत पिडीतेच्या आईने रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक कांचन काळे करीत आहेत.