नाशिक : नाशिकमधील अपोलो हॉस्पिटलच्या नर्सिंग हॉस्टेलमध्ये एका 24 वर्षीय नर्सने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी रात्री घडली. अश्विनी केके असे या नर्सचे नाव असून ती मूळची केरळमधील त्रिचूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. कुटुंबीयांनी प्रेमविवाहाला नकार दिल्याने अश्वनीने आत्महत्या केल्याचे सुसाईड नोटवरून स्पष्ट होत आहे. नाशिमधील आडगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.