प्रेमविवाह केल्याने महिलेला जिवंत जाळले

0

लखनौ : आपल्या पसंतीच्या तरुणासोबत लग्न करणा-या एका महिलेला तिच्याच कुटुंबीयांनी जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे घडलेल्या घटनेमुळे ऑनर किलिंगचा विषय पुन्हा चर्चेला आहे. या घटनेतील गुल्फशा नामक पीडित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान, पीडित महिलेला जिवंत मरत असताना पाहून नंणदेने तिला वाचवण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात ती जखमी झाल्याने तिला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले आहे.

तीन वर्षांपूर्वी गुल्फशानं शेजारी राहणार्‍या साकिबसोबत प्रेमविवाह केला. मात्र आंतरजातीय विवाह केल्याने नाराज झालेल्या गुल्फशाच्या माहेरच्या नातेवाईकांनी सासरी जाऊन तिला जिवंत जाळले. याप्रकरणी एका आरोपीला घटनास्थळावरुन अटक करण्यात आली असून आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती मुरादाबादचे पोलीस अधीक्षक आशिष श्रीवास्तव यांनी दिली.