प्रेमसंबंधाच्या संशयातून जळगावात रीक्षा चालकाचा खून : आरोपीला एलसीबीने केली अटक

जळगाव : जळगावच्या शिवाजी नगर, हुडको भागातील भागातील पतीपासून विभक्त राहत असलेल्या महिलेशी असलेल्या प्रेमसंबंधाच्या संशयातून रीक्षा चालक असलेल्या नरेश आनंदा सोनवणे (28, रा.राजाराम नगर, दुध फेडरेशन) या तरुणाची चॉपरचे वार करून हत्या करण्यात आल्याची घटना शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. खुनानंतर संशयीत आकाश सखाराम सोनवणे (24, कानळदा रोड, जळगाव) हा पसार झाला होता मात्र या आरोपीच्या जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत.

अनैतिक संबंधाच्या संशयातून रीक्षा चालक तरुणाची हत्या
जळगाव शहरातील शिवाजी नगर हुडको भागात पतीपासून विभक्त विवाहिता दोन मुलांसह राहते. या महिलेशी नरेश आनंदा सोनवणे (28, रा.राजाराम नगर, दुध फेडरेशन) या तरुणाशी जुनी ओळख असल्याने त्याचेही महिलेच्या घरी येणे-जाणे होते तर संशयीत आरोपी आकाश सखाराम सोनवणे (24, कानळदा रोड, जळगाव) याचे विवाहितेशी प्रेमसंबंध होते. शनिवारी नरेश शिवाजी नगर हुडको भागात आल्यानंतर आकाशही तेथे आला व त्यांच्यात जोरदार वाद झाल्यानंतर आकाशने जवळील चाकू/चॉपरसारख्या धारदार शस्त्राने नरेशच्या पोटात दोन वेळा वार केल्याने नरेशचा मृत्यू ओढवला.

गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या
जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या नेतृत्वातील जितेंद्र पाटील, विजयसिंह पाटील, अक्रम शेख, प्रीतम पाटील आदींच्या पथकाने संशयीत आरोपी आकाशला रेलवे स्टेशन परीसरातून ताब्यात घेतले तर महिलेलादेखील चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले आहे.