प्रेमसंबंध न ठेवल्यामुळे अल्पवयीन मुलीस जीवे मारण्याची धमकी ; चोपडा शहरातील तरुण जाळ्यात

If You Don’t have a relationship, threaten to murder and make the photo viral : Chopda City Youth Arrested By The Police चोपडा : अल्पवयीन तरुणीने प्रेमसंबंध कायम ठेवावेत अन्यथा मर्डर करून सोशल मिडीयावर फोटो व्हायरल करेल, अशी धमकी देणार्‍या चोपड्यातील तरुणाविरोधात तरुणीच्या फिर्यादीनुसार विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. सागर दगडू पाटील (रा.चोपडा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

त्रासाला कंटाळून संबंधास नकार
17 वर्षीय पीडीत अल्पवयीन तरुणीच्या फिर्यादीनुसार, ती अल्पवयीन असल्याचे माहित असतांना देखील संशयीत सागर पाटील याने वेळोवेळी पाठलाग केला तसेच पीडीतेच्या मोबाईलवर वेळोवेळी संपर्क साधून इच्छा नसतानाही प्रेमसंबंध निर्माण करण्यास भाग पाडले मात्र त्यानंतर होणार्‍या त्रासाला कंटाळून पीडीतेने प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला. याचा राग आल्याने आरोपी सागरने मंगळवार, 27 सप्टेंबर रोजी एम.जे.कॉलेज, चोपडा येथे सकाळी 11 वाजेच्या सुमारास पीडीतेस तू माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेवले नाही, तर एक ते दिड महिण्यापूर्वी एका मुलीचा जसा खून झाला तसा तुझा करेल व तुझे फोटो सोशल मिडीयावर प्रसारीत तुझी बदनामी करेल, अशी धमकी दिली.

महाविद्यालयात केली तरुणीला मारहाण
एवढेच नव्हे तर माझ्यावर प्रेम करावे व लग्नदेखील करावे लागेल, असे बोलून पीडीतेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करीत चापटांनी मारहाण केली. या प्रकरणी पीडीतेने तक्रार दिल्यानंतर मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक अजित सावळे करीत आहेत.