प्रेमासाठी दोन लाख पाण्यात…

0

प्रेमासाठी वाटेल ते करण्यासाठी तयारी प्रेमींची असते. इतरांपेक्षा हटके करण्याची धडपड काही प्रेमीवीर करीत असतात. पण वेगळं काही करण्याच्या नादात दोन लाख पाण्यात गेले, तर काय, अशीच घटना नुकतीच अमेरिकेच्या कॅनजस शहरात घडली. गर्लफ्रेन्डला प्रपोज करताना दोन लाखांची अंगठी नदीत पडली.

कॅनजस शहरातील सेथ डिक्सन नावाच्या एका व्यक्तीला आपली गर्लफ्रेन्ड रुथ सलासला लग्नासाठी प्रपोज करायचे होते. ‘उबर’मध्ये काम करणारा डिक्सन मागील चार वर्षांपासून रुथला डेट करत होता. प्रपोज करण्यासाठी या बद्दादराने नदीवर बनलेल्या पुलाची निवड केली. आपली गर्लफ्रेन्ड रुथ सलासला लग्नासाठी प्रपोज करण्यासाठी डिक्सनने 3000 डॉलरची (सुमारे 2 लाख रुपये) हिर्‍याची अंगठी खरेदी केली होती.

आपल्या मित्रासह तो रुथ सलास घेऊन नदीवरील पुलावर गेला. या सोहळा सुरळीत सुरू होता. मात्र, अंगठी घालण्याची वेळ आली अन् नेमका घात झाला. डिक्सनने अंगठी देण्यासाठी बॉक्स उघडताच तो खाली पडला, त्यामधील अंगठी नदीत पडली. त्यांच्या पंधरा मित्रांनी अंगठी शोधण्यासाछी नदीत झेप घेतली. पण त्यांना अंगठी सापडली नाही, पण डिक्सनचं हे प्रपोज अविस्मरणीय ठरलं.