प्रेमीयुगलाची विहिरीत उडी घेवून आत्महत्या

0

धुळे । साक्री तालुक्यातील दातर्ती येथे प्रेमीयुगलाने आत्महत्या केल्याच्या घटना घडल्याने साक्री तालुक्यात खळबळ माजली आहे. दातर्ती येथील प्रेमीयुगलाने गाव शिवारातील एका विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या प्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. महिन्याभरात प्रेमीयुगलाने आत्महत्या करण्याची ही दुसरी वेळ आहे. गावातील शिवम आणि स्वाती यांचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र, घरच्याच्या आग्रहामुळे शिवमला अन्य मुलीशी विवाह करावा लागला होता. त्यामुळे शिवम आणि स्वाती यांची घुसमट होत असल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. या दोघांनी मंगळवारी सायंकाळी विहिरीजवळ गाडी लावली. सर्वांना लक्षात यावे म्हणून विहिरीशेजारी दोघांनी चप्पल आणि बूट काढले. त्यादरम्यान गावात स्वाती नाही हे लक्षात आल्यावर शोधाशोध सुरू झाली. मग शिवमही कुठेच दिसत नसल्याचे कळाले. नातेवाईक आणि मित्र परिवाराने दोघांचा शोध सुरू घेण्यास सुरूवात केली.

बूट व चप्पल वरून आले निदर्शनात
शेत शिवारातील विहिरीचा शोध घेतल्यावर गावातील एकाला शिवमची गाडी आणि बुट तसेच स्वातीची सॅडल दिसली. त्यावरून या दोघांनी विहिरीत उडी मारूत आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. विहिरीत जास्त पाणी असल्याने त्या दोघांचे मृतदेह बाहेत काढता येत नव्हते. अखेर मध्यरात्री त्यांचे मृतदेह बाहेर काढले. या घटनेमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी तालुक्यात घडली होती.त्याला महिनाही उलटला नसताना अशीच घटना आता दातर्ती गावात घडल्याने खळबळ उडाली आहे.