पुणे : आपल्यासोबत पळून येत नाही म्हणून प्रियकराने आपल्या प्रेससीवर गोळीबार केल्याची घचना पुण्यातील खेड येथे शिरोली येथे घडली आहे. खेडे पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी कृष्णा राजपूतला ताब्यात घेतले आहे.काजल लक्ष्मण शिंदे असं या जखमी मुलीचं नाव आहे. सकाळी दुध साखर आणयाला गेल्या मुलीवर गोळीबार झाल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शिरोली येथे गुरुवारी सकाळी आठ वाजता अल्पवयीन मुलीवर गोळीबार करण्याची घटना घडली आहे. 17 वर्षाची तरुणी सकाळी दूध आणि साखर आणण्यासाठी बाहेर पडली. तेव्हा दबा धरुन बसलेला तिचा प्रियकर कृष्णा राजपूत याने तिच्यावर गोळीबार केला. तरुणीने त्याच्यासोबत पळून जाण्यास नकार दिल्यामुळे चिडलेल्या कृष्णा राजपूतने तिच्यावर गोळ्या झाडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अल्पवयीन तरुणी गंभीर जखमी असून खेड येथील खासगी हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरु आहे. चाकण पोलिसांनी आरोपी कृष्णाला ताब्यात घेतले असून खेड पोलिस तपास करत आहे.
गोळी झाडण्याचे नेमके कारण
चाकण येथील रहिवासी 25 वर्षीय कृष्णा राजपूत आणि 17 वर्षांच्या तरुणीचे काही महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. तरुणी सध्या शिरोली येथे राहात असली तरी आधी ती कुटुंबियांसोबत चाकण येथे राहात होती. येथेच दोघांची ओळख झाली आणि प्रेमसंबंध जुळले होते. काही कारणामुळे तरुणी कुटुंबासोबत चाकण येथून शिरोली येथे राहाण्यास आली होती.
दबा धरून बसला होता मारेकरी प्रियकर 25 वर्षांचा कृष्णा राजपूत गुरुवारी सकाळपासून तरुणी केव्हा घराबाहेर पडते याची वाट पाहात तिच्या घराबाहेर दबा धरुन बसला होता, असे खेड पोलिसांनी सांगितले. तरुणी किराणा दुकानात जात असताना कृष्णाने तिला सोबत चलण्याचा आग्रह केल्याची माहिती आहे. मात्र तरुणीने नकार दिल्याने संतप्त तरुणाने तिच्यावर गोळीबार केला.