औरंगाबाद – औरंगाबादच्या उस्मानपुरा भागात राहणार्या कोमल अडागळे या वीस वर्षांच्या तरूणीचा मृत्यू संशयास्पदरित्या झाल्याची माहिती समोर आली आहे. कोमल तीन महिन्यांची गरोदर होती. कुत्रा चावल्याने कोमलला घाटी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिचा मृत्यू झाल आहे. ती आपल्या प्रियकरासोबत राहात होती. उस्मानपुरा भागात नागसेन नगरमध्ये राहणार्या कोमलचा विवाह काही वर्षांपूर्वी झाला होता. पण ती तिच्या नवर्यासोबत राहिली नाही. तिच्या शेजारीच राहणार्या परजित नावाच्या तरूणासोबत तिचे प्रेमसंबंध लग्नापूर्वीच जुळले होते. त्यामुळे संसार सोडून कोमल त्याच्यासोबतच राहात होती.