वरणगाव । 15 दिवसांपूर्वी प्रेयसीने आत्महत्या केल्याचे दु:ख सहन न झाल्याने प्रियकरानेही आत्महत्या केल्याची घटना रविवारी पिंपळगाव येथे घडली. पिंपळगाव खुर्द येथील प्रविण बाळू कोळी (वय 23) यांचे मोठ्या भावाच्या मेहूणीसोबत प्रेमसंबंध होते. परंतु घरच्यांचा त्यांना विरोध असल्याने त्यांचे लग्न होत नव्हते. 15 दिवसांपूर्वी प्रवीणच्या प्रेयसीने आत्महत्या केली. तेव्हापासून प्रविण तणावात होता. त्याने चिठ्ठी लिहून घरात कोणी नसतांना छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. वरणगाव पोलीस स्थानकात भास्कर कोळी यांच्या फिर्यादीवरून नोंद करण्यात आली . तपास सपोनि दिलीप गागुर्डे हे.कॉ. जितेंद्र नारेकर करीत आहे.