उल्हासनगर । प्रेयसीसोबत झालेल्या वादातून प्रियकराने व्हिडिओ कॉल करून लाईव्ह आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगर येथे घडला. हनी आयवाणी असे आत्महत्या करणार्या प्रियकराचे नाव आहे.दोघांमध्ये जिवापाड प्रेम होते. पण, अचानक दोघांमध्ये कडाक्याचा वाद झाल्यामुळे प्रियकराने टोकाचे पाउल उचलले. त्याने स्वत: च्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत प्रेयसीला मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून सांगितले. यावर प्रेयसीने तू न थांबता आत्महत्या करून दाखव असे, बोलताच प्रियकराने लाईव्ह आत्महत्या केली.
त्या दोघांचाही ठरला होता दुसरीकडे विवाह
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उल्हासनगर कॅम्प नंबर 5 परिसरातील साईबाबा मंदिराजवळ असलेल्या एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर हनी आयवाणी हा तरुण आपल्या कुटुंबासह राहत होता. त्याचे नालासोपारा परिसरात राहणार्या 27 वर्षीय रेखा (नाव बदलेले) या तरुणीसोबत प्रेमसंबंध जुळले होते. कालांतराने दोघांमध्ये वाद झाल्याने त्या दोघांनी सहमतीने प्रेमसंबंध तोडले. त्यानंतर त्या दोघांचाही दुसरीकडे विवाह ठरला होता. त्यानंतर 21 मे 2017 रोजी दोघांची एका ठिकाणी
भेट होऊन कडाक्याचा वाद झाला.
प्रेयसीने सांगितले आत्महत्या करून दाखव?
हनीने घरी येऊन गळफास घेण्याच्या अवस्थेत रेखाला मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. यावर प्रेयसीने त्याला तू न थांबता आत्महत्या करून दाखव, असे बोलताच प्रियकराने लाईव्ह आत्महत्या केली. या घटनेबाबत प्रेयसीने कोणालाही कळविले नाही. यामुळे मृत हनीचे वडील नरेश आयवाणी (53) यांनी मुलाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी रेखा (नाव बदलेले) हिच्या विरोधात सुमाराला हिल लाईन पोलीस ठाण्यात द.वि.क. 306 अंतर्गत फिर्याद दाखल केली. स. पो. उप. नि. भूसारा हे या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.