भुसावळ- श्री क्षेत्र शेगाव येथे गजानन महाराज भक्तांसाठी प्रेरणा एग्मोर एक्स्प्रेसला थांबा देण्यात आला आहे. प्रायोगिक तत्वावर सहा महिन्यांसाठी हा थांबा देण्यात आला असून प्रवाशांच्या प्रतिसादानंतर पुढील कालावधी वाढवण्याबाबत निर्णय होणार आहे.गाडी क्रमांक 22137 व 22138 नागपुर-अहमदाबाद प्रेरणा एक्सप्रेसला 3 फेब्रुवारीपासून थांबा देण्यात आला आहे. गाडी क्रमांक 22137 शेगाव स्थानकावर 2.44 वाजता आल्यानंतर 2.45 वाजता अहमदाबादकडे प्रस्थान करेल तसेच ही गाडी आठवड्यातून रविवार, शनिवार व बुधवारी धावणार आहे तसेच गाडी क्रमांक 22138 ही शेगाव येथे 5.39 वाजता आल्यानंतर 5.40 वाजता नागपूरकडे रवाना होईल. ही गाडी आठवड्यातून सोमवार, मंगळवार, शुक्रवारी धावणार आहे. दरम्यान, गाडी क्रमांक 22663 व 22664 जोधपूर-चेन्नई एग्मोर एक्सप्रेसलाही शेगाव स्थानकावर 3 फेब्रुवारीपासून थांबा देण्यात आला आहे. गाडी क्रमांक 22663 शेगांवला 11.14 वाजता पोहोचल्यानंतर जोधपूरकडे 11.15 वाजता रवाना होईल तसेच केवळ आठवड्यातून ती रविवारी धावणार आहे तसेच गाडी क्रमांक 22664 ही शेगांव येथे 7.52 ला आल्यानंतर लागलीच 7.53 ला चेन्नईकडे प्रस्थान करेल तर आठवड्यातून केवळ ती मंगळवारी धावणार आहे.