प्रेरणा हायस्कूलमध्ये सामाजिक रक्षाबंधन

0

धनकवडी । आंबेगाव पठार येथील प्रेरणा हायस्कूलमध्ये सामाजिक रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला या उपक्रमात शाळेतील 500 विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. उपक्रमअंतर्गत विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 1 किलो याप्रमाणे पेपर रद्दी गोळा केली. रद्दी विकून जमा झालेल्या पैशांची, आर्थिक किंवा गरजेची वस्तू वेल्हा येथील तोरणा वसतिगृहातील विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले तोरणा वसतिगृहाचे सचिव व विश्‍वस्त मंदार अत्रे यांनी डोंगरी भागातील भौगोलिक व आर्थिक परिस्थिती वसतीगृहामध्ये विद्यार्थ्यांना येणार्‍या समस्या याविषयी माहिती सांगितली.

शिरीष पटवर्धन यांनी सामाजिक रक्षाबंधनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.कार्यक्रमाला मुख्याध्यापिका सुनंदा महाडिक तसेच शाळेचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.