प्रॉपर्टी हडपण्यासाठी आईसह, बहिणी, मेव्हणे असे सख्खे झाले वैरी

0

उस्मानिया पार्कमधील घटना ; 9 जणांविरोधात शहर पोलिसात गुन्हा ; चापटा बुक्क्यासह, लोखंडी रॉड, काठीने मारहाण

जळगाव- प्रॉपर्टीचे हक्क, अधिकार सोडून ती आमच्या नावावर करुन दे, यासाठी आवेस खान फरिद खान पठाण वय 25 रा. उस्मानिया पार्क, शिवाजीनगर या तरुणाला त्याच्या आई, दोन बहिणी तसेच मेव्हण्यांसह 8 जणांनी चारचाकीने मालेगावला घेवून जात तीन ते चार दिवस एका खोलीत डांबून काठी, लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना 6 रोजी समोर आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेतून प्रॉपर्टीसाठी सख्खे वैरी झाल्याचे समोर आले आहे.

आवेस खान फरिद खान पठाण वय 25 हे सर्वे न 419 प्लॉट नं 11/12 उस्मानिया पार्क, शिवाजीनगर येथे वास्तव्यास आहे. ते हातमजुरी करुन उदनिर्वाह भागवितात. त्यांच्यांत व कुटुंबियांमध्ये प्रॉपर्टीवरुन वाद सुरु आहे. या प्रॉपर्टीचे मालकी हक्क व अधिकार सोडून द्यावेत यासाठी 21 एप्रिल रोजी पहाटे तीन वाजता आवेस यांना सोबतच राहणारी आई मुनीजा कौसर, बहिणी बेनीजर फातेमा, मुंबई, नौशिन तबस्सुम तसेच मेव्हणे वकार अली, बाबा भाई, बाटाभाई, हैदरभाई व वकार अली यांचा काकाचा मुलगा (नाव माहिती नाही) सर्व रा. मालेगाव यांना शिवीगाळ करत मारहाण केली.

चारचाकीतून नेले मालेगाव, खोलीत डांबून मारहाण
मारहाणीदरम्यान संशतियांनी आवेस यास एका पांढर्‍या रंगाच्या तवेरा गाडीत बसविले. व जबरदस्तीने मालेगाव येथे घेवून गेले. प्रवासातही वकार अली यांचा काकाचय मुलाने आवेस यास चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. मालेगाव येथे पोहचल्यावर आवेस या एका खोलीत डांबून ठेवण्यात आले. वकारी अली याने आवेस यास तु तेरी सारी प्रॉपर्टी का हक और अधिकारी जबतक छोडेगा नही, हम तुझे जब तक छोडेंगे नही, अशी धमकी देवून लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच बाबा भाई याने काठीन, बाटाभाई याने पट्टयाने तसेच हैदरभाई याने चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत खांद्यावर, पाठीवर, हाताला, दोन्ही खांद्यावर, पाठीवर, पायाला, मांड्याना दुखापत होवून तो जखमी झाला होता. याप्रकरणी आवेस उपचारा घेवून बरा झाल्यावर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन त्याची आई, बहिणी, मेव्हणे यांच्यासह 8 जणांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक जगदीश मोरे करीत आहेत.